LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अल्पवयीन दलित मुलीची आत्महत्या :  आरोपी फरार ?

धारवाड : धारवाड तालुक्यातील गरग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन दलित मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात नहिम बेग नावाच्या तरुणाविरुद्ध पॉक्सो (POCSO), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  मात्र, आरोपी फरार असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, नहिम बेग याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्या मुलीला प्रेमात पाडले.  प्रेम जुळल्यानंतर मुलगी बुरखा परिधान करून त्याच्यासोबत फिरु लागली. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला समज दिली. यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले. मात्र, नहिमने मुलीशी संपर्क कायम ठेवला होता. त्याने दिलेल्या मोबाईलद्वारे दोघांमध्ये व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच, मुलगी बुरख्यात असतानाचा दोघांचा एकत्रित फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 8 मे रोजी संबंधित मुलीने आत्महत्या केली. यानंतर तिच्या पालकांनी गरग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नहिम बेगविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मात्र, पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही एफआयआर दाखल होऊन महिनाभर उलटल्यानंतरही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.  
पीडित मुलीचे कुटुंब न्याय मागत असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल