LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटील

गोकाक : येत्या 20 जूनपासून सुरू होणाऱ्या एसआयआर (विशेष मतदार पूनर्निरिक्षण) अभियानाला पक्षाने गांभीर्याने घेतले असून पात्र मतदारांची ओळख पटविण्यासाठी बीएलए-2 यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी शहरातील एनएसएफ कार्यालयात अरभावी भाजप मंडळातर्फे आयोजित शक्ती व महाशक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बीएलए-2 आणि बीएलओ यांनी परस्पर समन्वय साधून अपात्र मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक आयोगाकडून 20 जूनपासून मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया सुरू होणार असून 30 जूनपासून घराघरांत जाऊन पडताळणी केली जाणार आहे. या वेळी बीएलए-2 यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहून बनावट मतदारांची ओळख पटवावी आणि अशा नावांची यादीतून वगळण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
देशभरात आतापर्यंत 12 वेळा एसआयआर मोहीम राबविण्यात आली असून सुमारे 22 राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. मतदार नोंदणी आणि पुनरिक्षणाच्या कामात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अरभावीचे बीएलए-1 तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद कोप्पद यांनी मतदार केंद्र प्रमुखांना एसआयआरविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाध्यक्ष महादेव शेक्की होते.
बैठकीस भाजपचे राज्य उपाध्यक्ष तथा बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके, लक्कप्पा लोकुरी, निंगप्पा कुरबेट, इंदिरा अंतरगट्टी, मुत्तेप्पा कुल्लूर, रवी परुशेट्टी, परसप्पा बबली, प्रमोद नुग्गानट्टी यांच्यासह विविध मतदान केंद्रांचे प्रमुख, शक्ती व महाशक्ती केंद्रांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
एसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटीलजिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू' करवे ' ला मोर्चा आधीच धास्ती ..! महामोर्चाला परवानगी न देण्याची केली मागणी ..!!मराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनमराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनआमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, कौटिल्य, लिंगराज यांचा सहज विजय होणार 'जेवणात आढळल्या अळ्या: संतप्त विद्यार्थ्यांनी छेडले रात्री उशिरापर्यंत आंदोलनकिट्टू रजपूत यांची कराटे बुडकॉन राज्य उपाध्यक्षपदी निवड : निवडीबद्दल होतंय कराटे क्षेत्रात कौतुकशांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षा