LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

व्यावसायिक सिलेंडर दरवाढीविरोधात लक्ष्मी हेब्बाळकर यांची केंद्रावर जोरदार टीका

बेळगाव : व्यावसायिक सिलेंडर दरवाढीविरोधात राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची केंद्रावर सडकून टीका केली आहे. केंद्राने पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच व्यावसायिक सिलेंडर दरवाढ करून जनविरोधी निर्णय घेतला आहे, हे संतापजनक असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.


व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 2162 रुपयांवरून थेट
3153 रुपये करून केंद्राने सर्वसामान्य व्यावसायिकांची गळचेपी केली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय जनविरोधी आहे, असे म्हणत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्राच्या लोकविरोधी निर्णयावर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे.


पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "अशा प्रकारची दरवाढ यापूर्वी कधीही पाहिली नाही. काही राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच असा जनविरोधी निर्णय घेणे म्हणजे जनतेला दिलेल्या आश्वासनांवर पाणी फेरण्यासारखे आहे."


व्यावसायिक सिलेंडर दरवाढ हा हॉटेल उद्योगाला आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनाला बसलेला थेट फटका आहे. हॉटेल मालक आधीच दरवाढीने ग्रासले आहेत. या निर्णयामुळे खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढतील. परिणामी, आपले दैनंदिन जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असेही
लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
केंद्र सरकार निवडणुकांनंतर पुन्हा एकदा जनतेची फसवणूक करत आहे. लोकांचे जगणे असह्य होण्याआधी केंद्राने सर्वसामान्यांचा विचार करून तात्काळ भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम