LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कोयनेने गाठला तळ ...! उत्तर कर्नाटक होणार व्याकुळ ..!!

चिकोडी : कोयनेने तळ गाठला असून आणखीन काही दिवस वरूनराजाने दडी मारली तर उत्तर कर्नाटक तहानेने व्याकुळ होण्याची शक्यता आहे.

 उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या केवळ 15 टीएमसी पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.
या परिस्थितीमुळे कृष्णा नदी खोऱ्यातील उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोयना धरणातून सोडले जाणारे पाणी कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांमार्फत थेट कर्नाटकमध्ये पोहोचते. या पाण्यावर बेळगाव, विजयपूर, बागलकोट तसेच इतर भागांतील लाखो नागरिकांची तहान भागते.
दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात किंवा उशिरा पडणाऱ्या पावसामुळे उत्तर कर्नाटकातील नद्या कोरड्या पडतात आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधून कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती करत असते.
मात्र, यंदा कोयना धरणात केवळ 15 टीएमसी पाणी शिल्लक असल्याने महाराष्ट्राकडून पाणी सोडले जाईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
यामुळे बेळगाव, बागलकोट आणि विजयपूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनासमोर पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती