LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गटारीचे बांधकाम अर्धवट : कावळेवाडी ग्रामस्थ झालेत त्रस्त

बेळगाव : अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या त्या गटारीमुळे कावळेवाडी ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यांनी या अर्धवट अवस्थेत पडलेल्या गटारीचे बांधकाम त्वरित पूर्ण करून ग्रामस्थांचा त्रास दूर करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.



बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कावळेवाडी गावात राबविण्यात आलेल्या विकास कामांतर्गत बांधण्यात आलेल्या गटारीचे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्धवट अवस्थेत पडलेली या गटार वजा चरित केर कचरा आणि सांडपाणी तुंबले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. इतकेच नाही तर तुंबलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील वर्षी सुरू करण्यात आलेले गटारीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. गटार बांधणीसाठी सांडपाणी अडवून ठेवण्यात आल्याने पाणी तुंबून त्याला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गटारीतून पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने अवकाळी पावसात पाणी थेट घरांमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि ग्रामस्थांना त्रस्त करणाऱ्या या गटारीचे बांधकाम त्वरित पूर्ण करून लोकांचा त्रास थांबवावा अशी मागणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अनेकवेळा करूनही काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांतून केला जात आहे.
गटारीचे अर्धवट अवस्थेत पडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून ग्रामपंचायतीकडे केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम