LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' ज्वाला ' च्या सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंकाचे प्रकाशन थाटात

बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली " ज्वाला " दीपावली अंकाची वाटचाल सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत पोहोचली आहे. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीतही ही परंपरा अखंडित सुरू असून कृतिशील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव वार्ता न्युज पोर्टलच्या " ज्वाला "दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून मालोजी अष्टेकर बोलत होते. सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस सांस्कृतिक भवन येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी होते.



सुरवातीला पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविकात " ज्वाला "च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा इतिहास आणि अनुभव सांगितला. व्यासपीठावर मालोजीराव अष्टेकर, आर.एम. चौगुले, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी, शेखर पाटील, संपादक सुहास हुद्दार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी, मालोजीराव अष्टेकर, आर.एम. चौगुले, कृष्णा शहापुरकर, शेखर पाटील, सी.एम. गोरल, सुहास हुद्दार, शिवानी पाटील यांच्या हस्ते " ज्वाला " दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.



मालोजीराव अष्टेकर यांनी " ज्वाला "च्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच बेळगाव वार्ताचे संपादक कृष्णा मुचंडी यांनी 1970 च्या दशकात मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक कवी कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, कादंबरीकार रणजित देसाई, अनंत मनोहर यांच्या लेखणीने साकारला. ज्वाला"ला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ, उत्कृष्ट दिवाळी अंक असे तीन तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सीमाभागातील वाचकांसाठी वैचारिक मेजवानी "ज्वाला" देत आहे, असे देखील ते म्हणाले.



समिती नेते आर.एम. चौगुले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सी. एम. गोरल यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानी पाटील यांनी केले.कार्यक्रमास वार्ताचा वाचक वर्ग उपस्थित होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम