LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

स्पर्धात्मक व्यापार युगात उद्योजकांनो नवीन कल्पनांसह कार्यरत राहा : जयंत हुंबरवाडी यांनी दिला सल्ला : लिंगायत बिझनेस फोरम पदग्रहण समारंभात उत्साहात

बेळगाव : आजच्या स्पर्धात्मक व्यापाराच्या युगात उद्योजकांनी नवीन कल्पनांसह कार्यरत राहण्याचा सल्ला बेळगावच्या 'अशोक आयर्न वर्क्स' चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांनी दिला.


लिंगायत बिझनेस फोरम (एलबीएफ) च्या नवीन कार्यकारिणी समितीचा पदग्रहण समारंभ कारंजी मठाचे स्वामीजी श्री गुरुसिद्ध महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हिंदवाडी-आदर्शनगर येथील आयएमइआर सभागृहात पार पडला.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयंत हुंबरवाडी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना, केवळ स्वतःचा उदरनिर्वाह न करता, समाजातील गरजू व मागासवर्गातील लोकांना मदत करून त्यांना उन्नतीच्या दिशेने नेणे, हीच बसवेश्वरांची खरी शिकवण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


माजी अध्यक्ष किरण अगडी यांनी गेल्या चार वर्षांतील एलबीएफच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि संस्थेच्या स्थापनेपासून योगदान देणाऱ्या सदस्यांचे स्मरण केले. यावेळी मल्लिकार्जुन मुदनूर, विजय पाटील, राजशेखर शीलवंत, मडिवाळप्प तिगडी, संतोष पावटे, ईरन्ना देयनव्वर, राजीव शिगीहळ्ळी, आणि राजू गुरव यांचा सत्कार करण्यात आला.


नवीन अध्यक्ष लिंगराज जगजंपी यांनी उपस्थितांचे आभार मानत नव्या कार्यकारिणीच्या दृष्टीकोनाची आणि बांधिलकीची माहिती दिली. “आम्ही ही जबाबदारी स्वीकारली असून, माजी कार्यकारिणीने घालून दिलेल्या पाया आधाराने संस्थेचा पुढील विकास घडवू,” असे ते म्हणाले.


या वेळी लिंगराज जगजंपी अध्यक्ष म्हणून, राजशेखर शीलवंत उपाध्यक्ष, सचिन बैलवाड कार्यवाह, ज्योती निंबाळ खजिनदार, संतोष पावटे सहकार्यवाह, आणि महांतेंश पुराणिक सदस्यत्व प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.


संस्थेचे ध्येय, मूल्ये व नव्या प्रतिज्ञेसह प्रतिज्ञा विधी पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुजाता हुंचेनट्टी यांनी वचन गायन सादर केले. डॉ. बसवराज जगजंपी यांनी श्री गुरुसिद्ध स्वामीजींचा परिचय करून दिला. स्वामीजी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. मडिवाळप्प तिगडी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला शहरातील उद्योजक, प्रतिष्ठित व्यापारी, एलबीएफचे सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम