LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हिडकल जलाशय पडत चाललंय कोरडं ...! केवळ 8 टीएमसी इतकंच पाणी राहिलंय शिल्लक ..!

news_1779784377_0_725.webp

 

चिक्कोडी :  बेळगाव आणि बागलकोट अशा दोन जिल्ह्यांचे  जीवनदायी स्रोत म्हणून ओळखले जाणारे हिडकल जलाशय (राजा लखमगौडा जलाशय) कोरडे पडत चालले असून पावसाळ्याला अजून काही दिवस बाकी असतानाच जलाशयाची पाणी पातळी खालावत चालल्याने दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे.

एकूण 51 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सध्या केवळ 8 टीएमसी इतकंच पाणी उरलं आहे. अलीकडच्या वर्षांत उन्हाळा संपण्यापूर्वीच जलाशय इतक्या मोठ्या प्रमाणात आटल्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.

हा जलाशय केवळ शेतीसाठीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचाही मुख्य स्रोत आहे. बेळगाव महानगर , हुक्केरी आणि संकेश्वर शहरांसह 100 हून अधिक गावांना याच जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यांतील अनेक दुष्काळग्रस्त भागांना सिंचन योजनांद्वारे या धरणातून पाणी दिले जात होते. मात्र सध्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे या योजनांवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिसरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर जलाशयातील उरलेलं पाणीही आटून जलाशय ‘डेड स्टोरेज’ स्तरावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन , “उरलेलं पाणी शेती किंवा इतर वापरासाठी सोडू नये. भविष्यात माणसं व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ते केवळ पिण्याच्या वापरासाठी राखून ठेवावं,” अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून प्रशासनाकडे केली गेली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती