LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ए टू चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ : एसकेई संघाची विजयी सलामी

एसकेई संघाचा खेळाडू श्रेयस पाटील ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी

news_1779794439_0_201.webp

 

बेळगाव : फिनिक्स क्रिकेट अकादमी आयोजित 11 वर्षाखालील मुलांच्या ' ए टू चषक ' क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सामन्यात एसकेई संघाने फिनिक्स अकादमी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. अष्टपैलू कामगिरी केलेल्या एसकेई संघाचा खेळाडू श्रेयस पाटील हा सामनावीराचा मानकरी ठरला.

 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसकेई संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 169 धावा काढल्या. श्रेयस पाटीलने चार चौकारसह 31 धावा काढल्या. सक्षम चव्हाणने 5 चौकारसह 28 धावांची खेळी केली. अश्वत कुलकर्णीने 2 चौकारासह 23 धावा काढल्या. फिनिक्सतर्फे विनोद पाटीलने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना फिनिक्स क्रिकेट अकादमी संघाने  20 षटकात 134 धावा काढल्या. भूमी हिने 2 चौकारासह 24 धावा काढल्या. नक्ष याने 10 धावा काढल्या. एसकेई संघातर्फे श्रेयस पाटील, विमान शिंगेरी व विवान एस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले
 उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून काकती गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, पुरस्कर्ते पवन माळदकर , नागेश तारीहाळकर, चेतन गवी, सुनील गाडीवडर, महांतेश गवी, सुनील देसाई, समर्थ कुडचीकर, दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी खेळाडूंच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पवन माळदकर यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले.  याप्रसंगी यल्लाप्पा कोळेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन  केले. त्यांच्याच हस्ते नाणेफेक करून सामन्याला चालना देण्यात आली. 

#cricketnews 
#belgaum
#sports 
#shreyashpatil 
#ske

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल