LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

बेळगाव : रक्तदान हे महादान म्हणून गणले जाते. त्यामुळे रक्तदानाबद्दल कोणतेही गैरसमज ठेवून घेऊ नयेत. तसेच स्वयं प्रेरणेतून  रक्तदान करावे. असे मार्गदर्शन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. टी.बामणे यांनी केले. आधार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने   रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. यामध्ये 30 हून अधिक सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले.तसेच बिम्स हॉस्पिटल, बेळगाव ब्लड बँक आणि विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने या शिबिरात रक्तदान करून घेण्यात आले. 

शिबिराचे उद्घाटन  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी या उपक्रमासाठी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल वड्डर यांनी फीत कापून   कक्षाचे उद्घाटन केले. 
तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन  होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉ. प्रशांत भोसले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
 व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे,  उपप्राचार्य डॉ.एम. एम. साणिकोप, रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष विकास गाडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. चंद्रशेखर, संस्थेचे संचालक डॉ. रोहित बामणे, डॉ. अभिषेक बामणे  आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी चिंचणीकर यांनी केले.  शिबिर संयोजनासाठी  कॉलेजच्या कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल