LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सरकारच्या गॅरंटी योजना बंद होणार नाहीत ....!

बेंगळूर : काँग्रेस सरकारच्या जनकल्याणकारी गॅरंटी योजनांपैकी गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येणार नाहीत, असे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले आहे.

 गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या काँग्रेस सरकारच्या जनकल्याणकारी योजना बंद केल्या जात आहेत, अशी अफवा  विरोधकांकडून पसरवली जात असून दिशाभूल करणाऱ्या या अफवात्मक प्रचारावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केले आहे.

 "गॅरंटी आहे, गॅरंटी राहील ! गॅरंटी योजना बंद होणार नाहीत, नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये," असे यासंदर्भात डिकेशींनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करत स्पष्ट केले आहे.
काहीजण मृत व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून योजनांचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची नावे, पत्ते आणि बँक खात्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया योजना बंद करण्यासाठी नसून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे लाभ योग्यरित्या पोहोचावेत यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये. सर्व गॅरंटी योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असेही मुख्यमंत्री  डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

#DKShivakumar
#guaranteescheme
#KarnatakaGovt

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
गांजा सेवन प्रकरणी एकावर गुन्हा दाखलबेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एकाला अटकराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक :  दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकरचा गौरवसंस्कार भारतीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम : कलाकारांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध‘ मयूर योगासन ’ स्पर्धा उत्साहात : 6 ते 70 वर्षे वयोगटातील एकूण 182 स्पर्धकांनी घेतला होता स्पर्धेत भागवडगावात भव्य रक्तदान शिबिर :  88 जणांनी केले रक्तदानसंजीवनगिरीवर दत्तनामाचा गजर; भव्य दत्तयाग सोहळ्याला उत्साहात प्रारंभमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील कटकारस्थानाचा निषेध :  म्हैसूरमध्ये भव्य आंदोलन : दोषींना अटक करण्याची मागणीआमदार शशिकला जोल्ले  म्हणाल्या, ' मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनला 'हिंदू कार्यकर्ता समावेश, अवलोकन बैठक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न : धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन