LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

माजी प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, ' पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक '

news_1781424316_0_440.webpबेळगाव- पुढच्या पिढीला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे, असे मत जी.एस.एस.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. 
 बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ' पाणी हेच जीवन   ' या विषयावर  बोलत होते. डॉ. निता   देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ,टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, दिल्ली येथील एम्स वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रख्यात शस्रक्रिया विशारद डॉ. मंजुनाथ पोळ, उपाध्यक्ष के. एल. मजूकर,  कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील  उपस्थित होते. 
     निसर्गावरील वाढते अतिक्रमण यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया मंदावत चालली आहे. जमिनीच्या पोटात असलेले पाणी कसे टिकवायचे यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. पाण्याच्या व्यापा-याचा प्रश्न मोठा असून यातील गुंतवणूक वाढत चालली असून यामुळे फार मोठा धोका संभवतो अशी भीतीही श्री. मेणसे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. 
यावेळी डॉ. पोळ किडणी ट्रान्सपलंट व मधूमेह शस्रक्रिया यासंबंधी सविस्तर माहिती देऊन उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन केले. 
   यावेळी   रविंद्रनाथ जुवळी व सुरेन्द्र देसाई , यांनी हिंदी गीते सादर केली . प्रारंभी अरूण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली. 
     सुरेन्द्र देसाई  यांनी प्रास्ताविक केले तर विठ्ठल पोळ यानी पाहुण्यांची ओळख करून दिली. विजय वाईगडे यांनी  आभार मानले.

#anandmenase 
#drmanjunathpol
#panihechjivan

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल