LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे !  : बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

निपाणी :  शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून उभा आहे. 

यंदा 25 मे पासून रोहिणी नक्षत्रला सुरुवात झाली आहे . त्या पार्श्वभूमीवर निपाणी भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. सध्या राजधानीतील राजकारणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी सह कार्यकर्त्यांचे लक्ष राजकीय घडामोडी कडे लागले आहे. तर बियाण्यांचा पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पावसासाठी आभाळाकडे लागले आहे. 
 शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून बियाणे, खते आणि औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. उन्हाचा तडाखा कायम असतानाच रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रोहिणी नक्षत्रा पाऊस पडला तर खरीप हंगाम चांगला जातो, अशी शेतक-यांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. नांगरणी स-या सोडणीच्या कामासह  शेणखत टाकून झाले आहे. आता फक्त पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, मूग, उडीद पिकाची पेरणी करणे सोपे होणार आहे. 
दुसरीकडे राजधानी बेंगलोर येथे मुख्यमंत्री निवडण्याचे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री बदलानंतर अनेक खात्याच्या मंत्रिमंडळातही बदल होण्याच्या शक्यतेवर शहरासह ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून दुसरीकडे सर्वत्र राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती