LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अस्वलाच्या हल्ल्यात  शेतकरी गंभीर जखमी

बेळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. 

खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील हुलंद गावालगतच्या जंगल परिसरात ही घटना घडली आहे. महेश गावडे (वय 25,  रा. हुलंद ) असे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे नेहमीप्रमाणे आपली गाय चारण्यासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेला होता. दिवसभर जनावरे चारून तो संध्याकाळी घरी परतत असताना झुडपांमधून अचानक बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला.
जीव वाचवण्यासाठी महेश यांनी जवळच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पायाचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात महेश याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून त्याला तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आपत्कालीन उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल