LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद

बेंगळूर : कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात डॉ. जी. परमेश्वर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते राज्याचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले.

 सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिलेल्या डॉ. परमेश्वर यांना डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात  उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी 2018- 2019 या कालावधीत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते.
एमएससी आणि पीएचडी पदवीधारक असलेले डॉ. परमेश्वर हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परदेशात शिक्षण घेतलेल्या परमेश्वर यांनी यापूर्वी माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, क्रीडा, माहिती व प्रसार, रेशीम, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
डॉ. परमेश्वर यांचा जन्म 6 ऑगस्ट 1951 ला गोल्लनहळ्ळी येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण गोल्लनहळ्ळी आणि हेग्गेरे येथील सरकारी शाळांमध्ये घेतले. त्यानंतर 1959 मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या श्री सिद्धार्थ हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी तुमकुरू येथील सरकारी महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले. युनिव्हर्सिटी ऑफ अग्रीकल्चर सायन्स बेंगळूर (University of Agricultural Sciences Bangalore) मधून बीएससी आणि त्यानंतर एमएससी पदवी संपादन केली.
1989 मध्ये श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेज (Sri Siddhartha Medical College) च्या उद्घाटनासाठी डॉ. परमेश्वर यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री एस. एम. याह्या आणि श्री सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. 
त्यानंतर एस. एम. याह्या यांनी त्यांची ओळख तत्कालीन एआयसीसी सरचिटणीस मोहसीन किडवाई यांच्याशी करून दिली आणि त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली.
1989 मध्ये डॉ. परमेश्वर यांनी मधुगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जनता दलाचे उमेदवार सी. राजवर्धन यांचा पराभव केला आणि प्रथमच विधानसभेत प्रवेश केला. 1993 मध्ये एम. विराप्पा मोईली यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेशीम राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
काँग्रेसमधील अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. जी. परमेश्वर यांच्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

#gparameshwar
#deputyCm

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुख्यमंत्रीपदी  डी. के. शिवकुमार,  कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्यजगातल्या लोकांवर आजही रामकथेची मोहिनी : सच्चिदानंद डॉ.शेवडे'पारस धर्म' संस्कार शिबीर उत्साहात : विद्यार्थ्यांचा शिबिराला मिळाला  उत्स्फूर्त प्रतिसादकौशल्य-आधारित शिक्षण घेणे आज काळाची गरज :  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभेत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले मतशिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान : शिवप्रेमींसाठी एक पर्वणीचडॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदबी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार आसिफ (राजू) सेठ यांची शाळांना भेट आसिफ सेठ म्हणाले, गुणात्मक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण करा '