LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

धुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ

निपाणी : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे तवंदी घाट परिसरातील रस्ता जलमय झाला होता. दमदार पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.

निपाणी शहरा जवळ असलेल्या  तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते. याशिवायडोंगरावरून लहान मोठे दगड क पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाहने थांबवून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. 
 पावसामुळे डोंगर भागातून रस्त्यावर येणारे पाणी आणि पाण्यातून येणारे लहान मोठे दगड यामुळे व वाहनधारकांची तारांबळा उडाली. त्यामुळे नजीकच असलेल्या हॉटेल अमर मधील कर्मचाऱ्यांनीह वाहनधारकांची तारांबळ लक्षात घेऊन भर पावसात रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहनधारकांना सहकार्य केले. त्यामुळे तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती. बुधवारी आणि गुरुवारी वाळकी याद्यानवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गुरुवारी तवंदी घाटात पाणी रस्त्यावरून येत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. डोंगरातून येणारे लाल मातीचे पाणी आणि त्यातून येणारे लहानमोठ्या दगडामुळे वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याबरोबरच पाण्यापासून लांब घेऊन वाहने रस्ता पार करावी लागत होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचा मोठा लोंढा वाहताना दिसत होता. रस्त्याच्या मोठ्या चारीतून पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत होते. 

निपाणी शहरा जवळ असलेल्या  तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते. याशिवायडोंगरावरून लहान मोठे दगड  पाण्यातून आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाहने थांबवून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करत होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. 
 पावसामुळे डोंगर भागातून रस्त्यावर येणारे पाणी आणि पाण्यातून येणारे लहान मोठे दगड यामुळे व वाहनधारकांची तारांबळ उडाली. त्यामुळे नजीकच असलेल्या हॉटेल अमर मधील कर्मचाऱ्यांनीह वाहनधारकांची तारांबळ लक्षात घेऊन भर पावसात रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहनधारकांना सहकार्य केले. त्यामुळे तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती. बुधवारी आणि गुरुवारी वाळकी याद्यानवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गुरुवारी तवंदी घाटात पाणी रस्त्यावरून येत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. डोंगरातून येणारे लाल मातीचे पाणी आणि त्यातून येणारे लहानमोठ्या दगडामुळे वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याबरोबरच पाण्यापासून लांब घेऊन वाहने रस्ता पार करावी लागत होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचा मोठा लोंढा वाहताना दिसत होता. रस्त्याच्या मोठ्या चारीतून पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत होते. 
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल