LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बारावी परीक्षा-2 मध्ये विद्यार्थिनींची बाजी

43311 पैकी 19367 विद्यार्थी तर 37224 पैकी 17397 विद्यार्थिनी झाल्या उत्तीर्ण

 बेंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने आज गुरुवार दिनांक 21 मे रोजी पीयूसी द्वितीय ( बारावी) परीक्षा-2 चा निकाल जाहीर केला.  कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकूण 80535 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 36764 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली.

परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 43311  विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 19367 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा दिलेल्या 37224  विद्यार्थिनीपैकी 17397 जणी उत्तीर्ण झाल्या.

निकाल कसा पाहावा ? : 
परीक्षार्थींना परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट kseab.karnataka.gov.in किंवा karresults.nic.in ला भेट द्यावी.  विद्यार्थ्यांना, वेबसाइटवरील '2026 द्वितीय पीयूसी परीक्षा-2 रिझल्ट' या लिंकवर क्लिक करून आणि आपला नोंदणी क्रमांक व संयोजन टाकून गुणपत्रिका डाउनलोड करता येईल, असे मंडळाने कळविले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST