LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करा

निपाणी पोलीस उपनिरीक्षकांचे शांतता बैठकीत आवाहन

निपाणी : 
मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण बुधवारी  दिनांक 27  साजरा होणार आहे. मुस्लिम बांधवांनी कायदा व नियमाच्या चौकटीत बकरी ईद सणाचे महत्त्व जोपासून हा सण शांततेत साजरा करावा. हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जोपासावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी  केले. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते.

निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू-मुस्लिम बांधवांच्यावतीने शांततेत साजरे केले जातात. वर्षागणीक साजरा होणाऱ्या सणांना अनेक अर्थानी महत्त्व आहे. या सणाचे महत्त्व सर्वांनीच अबाधित राखावे. मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण बुधवारी  दिनांक 27  साजरा होणार आहे. त्यामुळे हा सण मुस्लिम बांधवांनी शांततेने साजरा करावा. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही सहकार्य मिळेल, असेही काजोळ यांनी सांगितले. 
यावेळी शांतता कमिटीतील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना काजोल यांनी उत्तरे देण्यात आली.
 बैठकीस हाफिज अलीम हुसेन, माजी सभापती जुबेर बागवान, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, बक्तीयार कोल्हापुरे, मैनुद्दीन मुल्ला, अनिस मुल्ला, शरीफ बेपारी यांच्यासह हिंदू -मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

#निपाणी 
#nippani 
#piececommitee 
#bakarieid

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल