LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अतिवेग आणि निष्काळजीपणा ठरला कारणीभूत : बसला कॅबची धडक – इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

बेंगळुर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसला मागून भरधाव वेगात आलेल्या कॅबने धडक दिली. या अपघातात खासगी एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, स्नेहा कुमारी (वय 24, मूळच्या मदुराई, तामिळनाडू) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. आणखी दोन जण या घटनेत जखमी झाले आहेत. कौसर खानम (21) आणि कॅब चालक विनय (28) अशी अपघातातील जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना चिक्काजाला ट्रॅफिक पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे.


स्नेहा कुमारी इंडिगो एअरलाईन्सच्या कस्टमर केअर विभागात कार्यरत होत्या. सोमवारी पहाटे सुमारे 4.30 वाजता त्या आपल्या सहकारी कौसर खानमसोबत बगळूर क्रॉसहून केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कॅबने जात होत्या.


एअरपोर्ट मार्गावरील ITC फॅक्टरीजवळील सर्व्हिस रोडवर आले असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसला कॅबने मागून धडक दिली. या धडकेत स्नेहा, कौसर आणि कॅब चालक विनय हे तिघेही जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्वरित सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे स्नेहा कुमारी यांचा सकाळी 7.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.


जखमी झालेले कौसर खानम आणि विनय यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्राथमिक चौकशीनुसार कॅब चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणाच या अपघाताचे मुख्य कारण ठरले आहे, असे पोलिसांनी सांगितले. चालकाने मद्यसेवन केले होते की नाही हे तपासणीसाठी रक्तनमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम