LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी 

वाढतोय भटक्या कुत्र्यांचा वावर : मात्र पालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

निपाणी : शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून दिवसेंदिवस उपद्रवही वाढत आहे. तरीही पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपायोजना हाती घेतलेली नाही. येथील साईशंकर नगर मधील निहाल तुषार कांबळे या 11 वर्षीय मुलाचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्या मुलावर तात्काळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले आहे. 

निहाल कांबळे हा आपल्या मित्रा समवेत साई शंकर मध्ये क्रिकेट खेळत होता. त्यावेळी बॉल गटारीत गेल्याने तो आणण्यासाठी गेला होता. याच वेळी परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीतील एका कुत्र्याने त्याचा मांडीसह पाया जवळील पिंडरी व हाताचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या निहालने तेथून कसाबसा पळ काढून तात्काळ घरी जाऊन ही माहिती सांगितली. कुटुंबीयांनी निहालला महात्मा गांधी रुग्णालयात नेऊन उपचार केले.  
 यापूर्वी याच कांबळे कुटुंबीयातील लहान मुलावरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यावेळीही पालिका प्रशासनाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. शहरात दररोज श्वानांच्या हल्ल्यात वाढ होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र त्यावर कोणतीही उपायोजना केलेली नाही. संबंधित विभागाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी तुषार कांबळे यांच्या सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांच्या मालमत्तेची पडताळणी अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेगघुसखोरीच्या संशयावरून बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली 20 जणांची चौकशी ..!वेदगंगा आटल्याने पाणीप्रश्न गंभीर :  शहरवासीयांची पाण्यासाठी होतेय धावाधाव खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागली दुकानाला आग : सुमारे लाख-दीड लाख रुपयांचे झाले नुकसान सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच कलंडली : अपघातात तान्हुल्यासह 12 जण जखमी