LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?

बेंगळूर  : तब्बल आठवडाभर केपीसीसी अध्यक्षपदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सतीश जारकीहोळी हेच प्रदेशाध्यक्ष होतील, असा विश्वास अनेकांना होता. अनेकांनी यासाठी देव पाण्यात ठेवले होते. अशातच एक व्यक्ती एक पद ही हायकामांडची समोर आली आणि माशी शिंकली.

केपीसीसी अध्यक्षपदी आपलीच वर्णी लागणार असे ठामपणे वाटणाऱ्या सतीश जारकीहोळी यांचा विश्वास ' एक व्यक्ती एक पद ' या हायकमांडच्या सूचना वजा आदेशाने डगमगला. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी आपण हायकमांडसमोर आपले मत मांडले आहे. पण, अंतिम निर्णय हा हायकमांडचा असेल,आणि तो मला मान्य करावा लागेल असे सांगून हे पद आपल्याला कदाचित मिळणार नाही, हे अप्रत्यक्षरीत्या सांगून दिले.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर, त्यांच्या मुख्यमंत्रीपदामुळे रिक्त झालेल्या कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदी आता विधान परिषदेचे सदस्य बी.के. हरिप्रसाद यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
केपीसीसी अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील असलेले मंत्री सतीश जारकीहोळी यांना मात्र हे पद मिळाले नाही. मंत्रिपदासोबतच प्रदेशाध्यक्षपदाची मागणी त्यांनी केली होती. मात्र, काँग्रेस हायकमांडने "एक व्यक्ती – एक पद" हे धोरण स्पष्ट करत त्यांची मागणी नाकारली.
त्यामुळे सतीश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाची निवड केली असून, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बी.के. हरिप्रसाद यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

#KPCCPresident 
#BKHariprasad

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती