LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

स्टार एअरकडून बेळगाव विमानसेवेचा विस्तार

बेळगाव : स्टार एअर एप्रिल-मे महिन्यापासून आपल्या बेळगावमधील सेवा विस्तारण्याच्या तयारीत असून, स्टार एअरकडून नव्या मार्गांची सुरुवात तसेच अत्याधुनिक सेवांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रादेशिक संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे.


या विस्ताराच्या भाग म्हणून, कंपनी अत्याधुनिक Embraer E175 विमान निवडक मार्गांवर तैनात करणार असून, या विमानात व्यवसाय वर्गाच्या केबिनची सुविधा असणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मे महिन्यापासून हे विमान बेळगाव–मुंबई–कोल्हापूर मार्गावर धावणार आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.


स्टार एअरच्या या विस्तारात पुढील नव्या मार्गांचा समावेश राहणार आहे.



बेळगाव–जयपूर–बेळगाव: ही सेवा उडान योजनेअंतर्गत सुरू राहणार असून, परवडणाऱ्या दरात प्रवास शक्य होणार आहे.


बेंगळुर–बेळगाव–बेंगळुर : एप्रिलच्या मध्यापासून सेवा पुन्हा सुरू होणार.


बेळगाव–पुणे–बेळगाव: एप्रिलच्या मध्यातच सुरू होण्याची शक्यता.


बेळगाव–हैदराबाद–बेळगाव: ही नवी सेवा मे महिन्याच्या मध्यापासून सुरू होणार.


प्रादेशिक विमानसेवा वाढवणे आणि प्रवाशांना चांगली सेवा देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. व्यवसाय वर्गासह अत्याधुनिक Embraer E175 विमानाची सुरूवात आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे नवे मार्ग व्यवसाय आणि पर्यटन प्रवाशांना अधिक सुलभ आणि वेगवान जोडणी देतील, तसेच प्रादेशिक विकास आणि आर्थिक संधींना चालना देतील.” असे स्टार एअरच्या मुख्य व्यापारी आणि विपणन अधिकारी शिल्पा भाटिया यांनी म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम