LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बॅ. नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने केला गेला पत्रकारांचा सन्मान

बेळगाव : सदृढ समाज निर्मितीसाठी पत्रकार मोलाची भूमिका बजावतात. अशा पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक आहे. यासाठीच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या बॅ. नाथ पै सर्कल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजिण्यात आला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील म्हणाले.


बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स 51 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत समाजात घडणाऱ्या घडामोडींचे वास्तववादी चित्र जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्यासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी पत्रकारांच्या सेवाकार्याचा गौरव केला.


यानंतर मंडळाच्यावतीने बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर, विलास अध्यापक,विलास जोशी, संयुक्त कर्नाटकच्या कीर्ती, मल्लिकार्जुन मुगळी, ज्ञानेश्वर पाटील, सुबानी मुल्ला, उपेंद्र बाजीगर, प्रकाश बिळगोजी, रवींद्र जाधव, अमृत बिर्जे, सुहास हुद्दार,चेतन कारेकर, रोहन पाटील, मिलिंद देसाई, गिरीश कल्लेद, श्रीकांत काकतीकर आदींचा शाल,पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



कृष्णा शहापूरकर आणि कीर्ती यांनी यावेळी मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेले सामाजिक उपक्रम तसेच मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आणि संगीता स्वीट च्या पाटील कुंटुंबियांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केलेल्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
मंडळाचे सल्लागार आणि पत्रकार श्रीकांत काकातीकर यांनी विचार मांडताना पत्रकारांच्या कार्याचा गुणगौरव केला. तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पत्रकारांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा आणि आरती करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज, कार्याध्यक्ष प्रदीप मजुकर, परशराम घाडी नागेश शिंदे, सदानंद अरुंदेकर, शंकर चव्हाण, लक्ष्मण छत्रणावर, सदानंद कडगावकर, अण्णाप्पा मुगळीकर,सदानंद कदम, हिरालाल चव्हाण, यल्लापा बसरीकट्टी, संजय गठ्ठे, सुनील पुजारी, श्रीकांत काकतीकर यांच्या सह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम