LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ओढ्याच्या पात्रात बुडून 8 जणांचा मृत्यू

भटकळ : शिंपले गोळा करण्यासाठी ओढ्याच्या पात्रात उतरलेल्या 8 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील शिराळी येथील अळवेकोडी जवळ तट्टीहक्कल कळिनट्टी येथे 
आज रविवार दिनांक 25 रोजी घडली आहे.
मृतांमध्ये पडुशिराळी बेन्ग्रे येथील लक्ष्मी महादेव नाईक (42 ), शारदाहोळे येथील उमेश नाईक ( 30 ), लक्ष्मी नाईक ( 30), लक्ष्मी अण्णप्पा नाईक (60), लक्ष्मी शिवराम नाईक (49), ज्योती नागप्पा नाईक (34), मालती नाईक (38) आणि मास्तम्मा नाईक यांचा समावेश आहे. अळवेकोडी परिसरात सर्वांचे मृतदेह आढळून आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंपले गोळा करण्यासाठी ओढ्याच्या पात्रात उतरलेले हे सर्व जण एकमेकांचे हात धरून पुढे जात होते. मात्र, रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला होता. तसेच समुद्रातील भरतीमुळे पाण्याची पातळी वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.
या घटनेत नागरत्ना आणि महादेवी या दोघी बचावल्या असून त्यांना उपचारासाठी मणिपाल येथे हलविण्यात आले आहे. आणखी काही जण बेपत्ता असल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती भटकळ पोलीस ठाण्याने दिली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' त्याचा ' खून प्रेमप्रकरणातूनच ...!  :  म्हणे, खुनात तीन अल्पवयीनांसह चौघांचा सहभाग ...!बस-कारचा अपघात: आठ जण जखमीओढ्याच्या पात्रात बुडून 8 जणांचा मृत्यूनिपाणी मराठा सौहार्द सहकारी संस्थेला 16.69 लाखाचा निव्वळ नफा : संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली माहिती कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकू : रयत संघटनेचा निर्वाणीचा ईशाराविश्वकर्मा उद्यानास बेलेवाडी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भेट' डी. व्ही. पाटील स्मृती चषक ' स्पर्धेला प्रारंभ : 28 मे पर्यंत चालणार स्पर्धा : योगेश स्पोर्ट्स क्लब आणि  विराज स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला उदघाटनपर सामना आमदार असिफ (राजू) सेट  नागरी सुविधा पाहणी  पथकाने केली अमन नगर परिसरातील नागरी सुविधांची पाहणी : साधला स्थानिक नागरिकांशी संवाद स्वातंत्र्यपूर्व काळातील जुन्या विहिरीला मिळतंय पुनरूज्जीवन आठवडी बाजारात पाकिटमारी करताना आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या : पाच जणांच्या टोळीत चार महिलांचा समावेश ..!