LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' त्या ' खून प्रकरणी एका अल्पवयीनासह 5 जणांना अटक

बेळगाव  :मजगाव येथील राहुल तलवार या 22 वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 5 जणांना ताब्यात घेतले आहे. 
कारच्या खरेदी व्यवहारानिमित्त राहुल तलवार ( राहणार : तानाजी गल्ली, मजगाव-बेळगाव) याला हुंच्यानट्टी गावाच्या बाहेरील निर्जन भागात बोलावून तेथे त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 
पोलिसांनी या खून प्रकरणात 14 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त बोरसे यांनी ही माहिती दिली आहे.
  बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 27 मे 2026 रोजी तानाजी गल्ली, मजगाव येथील राहुल तिप्पण्णा तळवार या 22 वर्षीय युवकाच्या खुनाची तक्रार नोंदविण्यात आली. 
 पोलिसांच्या एफआयआरमध्ये 9 आरोपींसह इतर 4 -5 जणांची नावे नोंद करण्यात आली आहेत. एफआयआर नोंद झाल्याच्या 24 तासात आमच्या बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने 5 प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. 
सुरज सिदगवळी, योगेश दोडमनी, मंजुनाथ मुळकूर आणि देवाप्पा तळवार अशी अटक करण्यात आलेल्या 5 पैकी चौघांची नावे असून एक अल्पवयीन मुलगा आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे पोलीस आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती