LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

252.21 हेक्टरला' अवकाळी 'चा  फटका

जिल्ह्यात बागायतीच 3.25 कोटींचं झालंय नुकसान 


बेळगाव : मागील 20 दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील बागायती पिकांना मोठा फटका बसला असून या अवकाळीने  जिल्ह्यातील 252.21 हेक्टर मधील सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांच्या बागायती पिकांची हानी केली आहे. 

 एप्रिलच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायती पिके जमिनदोस्त झाली. मे महिन्यात परिस्थिती सुधारेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज फोल ठरला. एप्रिल महिन्यात 221.01 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत 2.93 कोटींहून अधिक आहे. तर 1 ते 20 मे दरम्यान झालेल्या पावसामुळे आणखी 30.20 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 28.62 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अथणी, चिक्कोडी, कागवाड, बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या भागांत सिंचनाची सुविधा असल्याने उन्हाळ्यातही फळे व भाजीपाला घेतला जातो, परंतु यंदा ते पूर्णपणे नष्ट झाले.
विशेषतः द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अथणी तालुक्यातच 146.43 हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. सवदत्ती तालुक्यात 24.40 हेक्टर केळीचे पीक नष्ट झाले आहे. मे महिन्यात बेळगाव, गोकाक व सवदत्ती तालुक्यांत 21.35 हेक्टर केळी तसेच 5.8 हेक्टर डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने 7 जूनपर्यंत मान्सून सुरू होईपर्यंत पावसाचा प्रभाव कमी होणार नसल्याचे कृषी व बागायती विभागाला सूचित केले आहे. त्यामुळे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बागायती पिकांबरोबर शेती पिकांचीही अवकाळी पावसाने हानी केली असून नुकसानीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही घटल्याचे दिसत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST