LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महापालिका हद्दीतील 187 धोकादायक झाडांना लागणार करवत 

बेळगाव : पावसाळ्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव महापालिका हद्दीतील 187  धोकादायक झाडांची तोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. 


 महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांच्या निर्देशानुसार  ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

वादळी पावसाळ्यात गुलमोहर, रेन ट्री, सिल्व्हर ओक आदी झाडे धोकादायक ठरतात. बेळगावमध्ये दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि जमिनीत जास्त ओलावा साचल्यामुळे या झाडांची मुळे कमकुवत होतात आणि ती कोसळण्याचा धोका वाढतो. वन विभागाच्या सहकार्याने सर्वेक्षण करून ही झाडे ओळखण्यात आली आहेत. 
ज्या झाडांची मुळे सैल झाली असून खोडदेखील कमकुवत झाले आहे. अशी झाडे वादळी वारा किंवा सततच्या पावसामुळे  मुळासकट कोसळण्याची शक्यता असते. मागील काही वर्षांत शहरात झाडे कोसळून वाहनांचे नुकसान, जखमी होण्याच्या तसेच जीवितास धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी यांच्या नेतृत्वाखाली मार्च महिन्यातच धोकादायक झाडांची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
आतापर्यंत 187 झाडे धोकादायक असल्याचे निश्चित करण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या यादीतील झाडेही यामध्ये समाविष्ट करून तोड मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
यापैकी सुमारे 50 झाडांची अंशतः तोड करण्यात आली असून, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत.

30 तक्रारींची नोंद :
मे महिन्यात धोकादायक झाडे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांबाबत महापालिकेकडे 30 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार मिळाल्या दिवशी संबंधित ठिकाणी जाऊन समस्या सोडवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तोड करण्यात आलेल्या झाडांचे अवशेष सदाशिव नगर स्मशानभूमीत साठवण्यात येत असून, त्यानंतर वन विभागाकडे सुपूर्द करून लिलावासाठी पाठवले जाणार आहेत.
एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे बेळगाव तालुक्यात 30 हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही मोहीम अधिक वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला ..!  गळाभेट घेत चाकूने गळ्यावर केले गळा ...!!अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू : दोघे मित्र जखमी येळ्ळूरवासीयांनी दिली अर्जुन गोरल यांना शब्दसुमनांजली कन्नड भवन प्रकरण भलतेच तापले : नियमभंगाचा आरोप : गुन्हा दाखल करण्याचा इशारामहागाईच्या विळख्यात सापडले गरिबांच्या घरकुलाचे स्वप्न :  शासनाकडून हप्ते थकले आणि सर्वसामान्यांचे गणितचं बिघडले ..!महापालिका हद्दीतील 187 धोकादायक झाडांना लागणार करवत हे बेनं पुन्हा पुटपुटलं : म्हणतंय बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग ...!' त्याचा ' खून प्रेमप्रकरणातूनच ...!  :  म्हणे, खुनात तीन अल्पवयीनांसह चौघांचा सहभाग ...!बस-कारचा अपघात: आठ जण जखमीओढ्याच्या पात्रात बुडून 8 जणांचा मृत्यू