Ad imageAd image

युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांच्या ‘ क्लटर टु क्लैरिटी ‘ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

Ravindra Jadhav
युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांच्या ‘ क्लटर टु क्लैरिटी ‘ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव – युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांच्या ‘ क्लटर टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ लोकमान्य ग्रंथालय येथे संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कु़ंटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बुक लव्हर्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य उदय लवाटे होते. व्यासपीठावर युवा लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत लाड उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर सुश्री गिरीजा हलगेकर व श्रीया भातकांडे यांनी ईशस्तवन आणि प्रार्थना सादर केली. त्यानंतर उदय लवाटे, जगदीश कुंटे,ज्योती कुकडोळकर-भरमुचे, मनोहर कुकडोळकर व ईश्वर लगाडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुळच्या बेळगावच्या पण सध्या बेंगळुरूमध्ये असलेल्या लेखिका सौ.ज्योती यांनी अंजना रीतोरिया यांच्या व्हिडिओतून लेखनाची प्रेरणा कशी घेतली व या पुस्तकाचे लेखन आपण कसे केले याची सुंदर माहिती दिली. दैनंदिन जीवनात आपण घरात नको असलेल्या वस्तुंचा पसारा कसा करतो व मग तो कसा आवरायचा या विषयी या पुस्तकात आपण मार्गदर्शन केले असून लहान वयातच ही सवय लावली की मुलांच्या जीवनात पुढे चांगल्या सवयी लागून भरपूर वेळ वाचतो असे त्या म्हणाल्या.
प्रमुख पाहुणे उदय लवाटेनी पुस्तकाचे व लेखिकेचे कौतुक करीत मोबाईल मध्ये सुद्धा कितीतरी नको असलेल्या गोष्टी असतात व त्या आवराव्या लागतात असे मत मांडले.
जगदीश कुंटे यांनी अध्यक्षीय भाषणात लेखिका ज्योती कुकडोळकर-भरमुचे यांना शुभेच्छा दिल्या. रमेश कुकडोळकर यांनी आभार मानले तर अनंत लाड यांनी सुत्रसंचालन केले.
चहापानापूर्वी लेखिकेने श्रोत्यांसाठी छोटासा क्वीझचा खेळ घेत बरोबर उत्तर देणाऱ्यांना बक्षीसे देत कौतुक केले. कार्यक्रमासाठी पुस्तक प्रेमी व कुकडोळकर-भरमुचे परिवाराची मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article