मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Ravindra Jadhav
मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.
महांतेश गुंजीकर (वय 27, राहणार खासबाग-बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून आज रविवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे.

महांतेश हा एका कंपनीचा कर्मचारी असून शनिवारी सायंकाळी तो बेळगाव शाखेतील 22 कर्मचाऱ्यांसोबत पार्टी करण्यासाठी कणकुंबीजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये गेला होता. रविवारी दुपारी तो जलतरण तलावात उतरला होता. त्यावेळी स्विमिंग ट्यूबमध्ये गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article