योग जलतरणपटू सुहास निंबाळकर यांचा सत्कार

Ravindra Jadhav
योग जलतरणपटू सुहास निंबाळकर यांचा सत्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 22 ( प्रतिनिधी) : बेळगावचे सुप्रसिद्ध योग जलतरणपटू व एक्वा डॉल्फिन ग्रुपचे अध्यक्ष सुहास निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

त्यांनी केलेल्या जलयोगाची नोंद परफेक्ट बुक ऑफ रेकॉर्डने घेतली होती. बेळगाव शहराचे आयुक्त अशोक दुड्गुंडी व बेळगाव शहराच्या महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते सुहास निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक जयंत जाधव, गिरीश धोंगडी, नितीन जाधव, विनायक अर्कसाली व इतर सदस्य उपस्थीत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article