महाराष्ट्र : श्रावणी दळवी या विद्यार्थिनीची 19 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.
ती अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा संचलित पी.एम. मूनोत कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
बहूप्रतिभावान खेळाडू म्हणून महाविद्यालयात ओळख निर्माण केलेल्या श्रावणी हिने सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर क्रिकेट खेळात आपले अस्तित्व सिद्ध केले असून तिच्या उल्लेखनीय खेळामुळे तिची 19 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.
श्रावणी ही जिल्हा परिषद शाळा, कुंबेफळ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री.आजिनाथ दळवी यांची मुलगी असून अभ्यासातही ती आघाडीवर आहे. तिच्या या निवडीबद्दल तिचे कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#cricket #maharashtracricketboard #kumbefal #mahilacricket #nivad #shravanidalavi