‘ जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणार, त्याने आपला हिशोब लिहून ठेवावा ‘ ….. आणि कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी …

Ravindra Jadhav
‘ जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणार, त्याने आपला हिशोब लिहून ठेवावा ‘ ….. आणि कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी …
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :

‘ ओम जय श्री राम, जय भारत,
‘ मला जीवनाचे सार समजते. मी शरीर आणि पैसा याला धूळ मानतो. तेच सत्कर्म केले गेले, तेच मैत्रीचे कर्तव्य होते. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज जे बाबा सिद्दी यांचं कौतुक केले जातेय, पण एक वेळ तो दाऊदसोबत मोक्का कायद्याखाली होता ‘.
त्याला मारण्याचे कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे आहे. आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो, त्यांचा हिशोब ठेवा…. जर कोणी आमच्या भावाला मारले तर आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देऊ …
जय श्री राम जय भारत ‘

लॉरेन्स गँगच्या एका सदस्याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे.

मोठ्या गुन्ह्याआधी लॉरेन्स बिष्णोईचे मौन व्रत असते. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधीही कारागृहात विशेष सेल मध्ये बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिष्णोईने 9 दिवस उपवास केला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री बाईकवरून आलेल्या तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एकजण फरार आहे. या हत्येमागचा नेमका मास्टरमाइंड कोण ? ही हत्या का केली गेली ? याबद्दल तर्कवितर्क लढविले जात असतानाच कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगवर पोलिसांच्या संशयाची सुई होती. आणि अखेर फेसबुकवर पोस्ट करीत लॉरेन्स बिष्णोई गॅंगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणार, त्याने आपला हिशोब लिहून ठेवावा, असं या पोस्टमध्ये लिहिलंय. गँगच्या एका सदस्याने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.

बाबा सिद्दीकी च्या हत्येआधी लॉरेन्स बिष्णोईने नवरात्रीत नऊ दिवसांचा मौन व्रत केला होता. यादरम्यान तो कोणाशी काहीच बोलायचा नाही. त्याचसोबत तो काही खायचाही नाही. जेव्हा जेव्हा बिष्णोई हे व्रत करतो, तेव्हा त्याच्या गँगकडून मोठा गुन्हा करण्यात येतो, असं सांगितलं जातंय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article