कैद्याने वाॅर्डनला केली मारहाण : बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात घडला प्रकार

Ravindra Jadhav
कैद्याने वाॅर्डनला केली मारहाण : बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात घडला प्रकार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : माजलेल्या कैद्याने कारागृहात वाॅर्डनला काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली आहे.

राहील पाशा उर्फ राहुल असे वाॅर्डनला मारहाण करणाऱ्या कैद्याचे नाव आहे . हासन येथील राहील पाशा याला गुंडा कायद्याखाली कारागृहात डांबण्यात आले असून त्याने कारागृहात सेवा बजावणाऱ्या वॉर्डन विनोद लोकापुरे याला मारहाण करून जखमी केले आहे.

राहील पाशा हा गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असून त्याच्या वाईट वर्तणुकीमुळे त्याला हासन येथून अलीकडेच हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले आहे. हिंडलगा कारागृहात आल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झालेली नसल्याने त्याला अंधार कोठडीत ठेवण्यात आले होते. आपली प्रकृती खालावली असून उपचारासाठी मला इस्पितळात दाखल करा अशी मागणी त्याने वॉर्डन विनोद लोकापुरे यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी वॉर्डन लोकापूर यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संमती दिल्यास वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाऊ असे उत्तर दिले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि संतापलेल्या राहुल पाशा याने लोकापुरे यांच्या हातातील काठी हिसकावून त्याच काठीने व लाथा बुक्क्यानी मारहाण करून जखमी केले.
मारहाणीत जखमी झालेल्या विनोद लोकापूर यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article