विद्याभारती क्षेत्रीय मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धला प्रारंभ

Ravindra Jadhav
विद्याभारती क्षेत्रीय मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धला प्रारंभ
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव, दिनांक 23 ( bn7news) : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला रविवार दिनांक 22 रोजी प्रारंभ झाला.

या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मलखांब प्रमुख अनुराधा पुरी, मलखांब प्रशिक्षक सुरज देसुरकर, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील उपस्थित होते. या मान्यवरांचे हस्ते मलखांब खांबाचे पुष्पहार घालून व श्रीफळ वाढून किरण जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी किरण जाधव म्हणाले की, पारंपरिक भारतीय खेळाचे पुनरुज्जीवन होत आहे. ही सर्व भारतीयांसाठी एक समाधानकारक बाब असून भारतीय खेळांना पुन्हा नव्या पिढीसमोर आणण्याचे काम विद्याभारती व संत मीरा शाळेकडून होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.

याप्रसंगी मलखांब पंच संकेत पाटील, स्वप्निल पाटील, प्रफुल्ल पाटील ,श्री चौगुले, किरण पावसकर, शामल दड्डीकर, धनश्री सावंत बापूसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, शाळेच्या मुख्यमंत्री आलिना पठाण, साईकिरण शिंदे, गणेश माळवी ,सान्वी पाटील, यश पाटील शिवकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्षेत्रीय स्पर्धेत कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या संघानी भाग घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article