विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ

Ravindra Jadhav
विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव, दिनांक 23 ( bn7news) : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेला रविवारी प्रारंभ झाला

उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार ,संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते ओमकार सरस्वती भारत माता फोटो पूजन दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना, ‘ जिद्द व ध्येय असल्यास यश निश्चित मिळते. यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे यासाठी प्रशिक्षकाची मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे, असे म्हटले.
याप्रसंगी शाळेच्यावतीने उपमहापौर आनंद चव्हाण व लक्ष्मण पवार यांचा प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, सुजल मलतवाडी, सिद्धांत वर्मा ,अभिषेक गिरीगौडर , चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, पंच उमेश मजुकर, जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, शामल दड्डीकर यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर तर धनश्री सावंत यांनी आभार मानले.
या स्पर्धेत यजमान बेळगांव ,बळ्ळारी, गुलबर्गा व आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याच्या 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या संघानी भाग घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article