वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले यांना ब्लॅक बेल्ट प्रदान | bn7news

Ravindra Jadhav
वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले यांना ब्लॅक बेल्ट प्रदान | bn7news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : इंडियन कराटे क्लब, बेळगांव जिल्हा क्रीडा संघटनेचे कराटेपटू वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे कराटेची बेल्ट परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 102 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. यामध्ये कराटेपटू वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.

हे तिन्ही विद्यार्थी गेल्या 08 वर्षापासून मच्छे येथील कराटे प्रशिक्षण केंद्रात कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कराटेचा सराव करतात. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदकेही मिळवली आहेत.
या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगांव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

रमाकांत कोंडूसकर (श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष), कपिल भोसले (समजासेवक), डॉ. पद्मराज पाटील (आदिवीर मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर), डॉ. विद्या पद्मराज पाटील (आदिवीर मल्टी – स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर) कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कराटेपटू वैभव कणबरकर, प्रणाली कणबरकर आणि रोहित चौगुले यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, नताशा अष्टेकर, ऋतिक लाड, परशुराम नेकणार, कृष्णा देवगाडी, सौरभ मजुकर, सुनिधी कणबरकर , संजना शिंदे, सिद्धांत करडी, आदित्यराज यादव, कृष्णा जाधव, अनुज कोली, सिद्दिका देवलापुर आणि जयकुमार मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पाटील यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article