‘ क्षयरोग मुक्त भारत ‘ अभियान भीतीपत्रकाचे अनावरण

Ravindra Jadhav
‘ क्षयरोग मुक्त भारत ‘ अभियान भीतीपत्रकाचे अनावरण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावः क्षयरोग निर्मूलनासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ क्षयरोग मुक्त भारत ‘ अभियानाच्या भीतीपत्रकाचे अनावरण बेळगावनगरीत करण्यात आले. आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव आणि संजीवीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावच्या वरिष्ठ एलएचव्ही महादेवी शिवमूर्तीमठ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पर्यवेक्षक नवीन कोटगी, पर्यवेक्षक प्रवीण बेटगार, संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे उपस्थित होते.

संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावच्या वरिष्ठ एलएचव्ही महादेवी शिवमूर्तीमठ यांनी रोपट्याला पाणी घालून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला चालना दिली.

प्रत्येक भारतीयांने या अभियानात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करून “क्षयरोगमुक्त भारत” निर्माण करूया असे उदगार संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी काढले.

क्षयरोग मुक्त भारत निर्माण करण्यासाठी पुढील शंभर दिवसात शाळा, महाविद्यालय, अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच जिथे जिथे सामूहिकपणे नागरिक जमतील तिथे तिथे प्रत्येकाची तपासणी करणार असल्याचे महादेवी शिवमूर्तीमठ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक प्रविण बेटगार यांनी सूत्रसंचालन केले तर संजीवीनी फौंडेशनच्या एचआर प्रमुख कावेरी लमानी यांनी आभार मानले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ क्षयरोग मुक्त भारत ‘ भीतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर उपस्थित आजी-आजोबांची क्षयरोग तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कल्पना शेट्येपन्नावर, नागम्मा रैनापूर,
संजीवीनी फौंडेशनच्या समुपदेशक सरिता सिद्दी व आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article