उमेश कलघटगी ‘ जायंट्स फेडरेशन ‘ पुरस्काराने सन्मानीत

Ravindra Jadhav
उमेश कलघटगी ‘ जायंट्स फेडरेशन ‘ पुरस्काराने सन्मानीत
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगावचे जलतरण प्रशिक्षक उमेश जी. कलघटगी यांना ‘जायंट्स फेडरेशन पुरस्कार-2024’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

जलतरणाच्या जगामधील विलक्षण योगदान आणि दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्याच्या निःस्वार्थ समर्पणाबद्दल जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली यांच्यातर्फे उमेश कलघटगी यांना हा प्रतिष्ठेचा ‘जायंट्स फेडरेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन, मुंबईचे उप-जागतिक अध्यक्ष ॲड. पी. सी. जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी अतिथी म्हणून दिनकर ए. अमीन, लगमन्ना दोडमणी, प्रकाश अष्टेकर, श्रीमती विद्या पै, मोहन कारेकर, आणि राजू माळवदे उपस्थित होते.

 उमेश कलघटगी यांनी गेल्या 23 वर्षांपासून शारीरिकदृष्ट्या विकलांग मुले, बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती, अंध, श्रवणदोष, आणि अनाथांना वाहतूक, किट आणि मुख्य आहारासह मोफत पोहण्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्यावतीने कलघटगी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे 9 हून अधिक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि शेकडो राष्ट्रीय जलतरणपटू घडले आहेत. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या जलतरण पटूंनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके आणि हजारो राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदके मिळवली आहेत.
प्रशिक्षणाच्या पलीकडे उमेश कलघटगी यांनी यशस्वी जलतरणपटूंना सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्राशी असलेल्या त्यांच्या अतूट बांधिलकीची दखल घेऊन उमेश कलघटगी यांना कर्नाटक सरकारने 2018 मध्ये कर्नाटक राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा जायंट्स फेडरेशन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article