बेळगाव जिल्ह्यावर दुःखाचे सावट : दोघे जवान शहीद

Ravindra Jadhav
बेळगाव जिल्ह्यावर दुःखाचे सावट : दोघे जवान शहीद
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात काल मंगळवारी झालेल्या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील दोघे जवान शहिद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात अनेक जवान जखमी झाले. गंभीर जखमीपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. यापैकी एकजण बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथील तर दुसरा जवान चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावचा रहिवाशी होता.

बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणाऱ्या शहीद जवानाचे नाव दयानंद तिरकण्णवर तर चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील शहीद जवानाचे नाव धर्मराज सुभाष खोत असे आहे.
अपघातात शहीद झालेल्या पाच जवानांत उडपी, बागटकोट येथील जवानांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article