स्वयंभूवरद सिद्धिविनायक मंदिरात आज मूर्ती प्रतिष्ठापणा

Ravindra Jadhav
स्वयंभूवरद सिद्धिविनायक मंदिरात आज मूर्ती प्रतिष्ठापणा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मार्कंडेय नगर, एपीएमसी समोर येथील निवासी मलिकार्जुन सत्तीगिरी यांनी 2018 साली उभारलेल्या द्विभुज स्वयंभूवरद सिद्धीविनायक मंदिरात गेल्या दोन डिसेंबर पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी महालक्ष्मी महा सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कळसा रोहन होणार आहे.

2 डिसेंबर रोजी मंगलवाद्यासहित पूर्ण कलश मिरवणूक काढण्यात आली. संगमेश्वरनगर एपीएमसीजवळील संगमेश्वर मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. वरद सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मिरवणूक झाली. लेझीम खेळ आणि धनगरी ढोल ताशाचा गजरात झालेल्या या मिरवणुकीत सुहासिनी डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीनंतर मंदिरात विविध कार्यक्रम झाले. 3 ते 5 डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी साडेसात वाजता महाआरती आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले.

6 डिसेंबर रोजी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर सरस्वती, महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे कळसा रोहन परमपूज्य म. नि. प्र.गुरुसीद्ध महास्वामीजी कारंजी मठ बेळगाव यांच्या हस्ते होणार असून दुपारी महाप्रसाद होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक कल्याणासाठी मल्लिकार्जुन सत्तीगिरी यांनी 21 दिवसाच्या उपवासाचे व्रत ठेवले आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article