तिढा सुटला ….! देवेंद्र फडणवीस विधिमंडळ गटनेते …! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणूनही झाली घोषणा ..!!

Ravindra Jadhav
तिढा सुटला ….! देवेंद्र फडणवीस विधिमंडळ गटनेते …! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणूनही झाली घोषणा ..!!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : अखेर तिढा सुटला आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याच नावाला पसंदी देण्यात आली.

गटनेते पदी निवड झाल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर ( उबाठा) शाब्दिक संधान साधले.

भाजप कोर कमिटी बैठकी झाली आणि या बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाच्या अनेक नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले. मुख्यमंत्रीपदी त्यांचीच वर्णी लावण्यात कोर कमिटी सदस्यांनी अनुमोदन दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भोगले. त्यानंतर 2019 मध्ये ते औटघटकेचे मुख्यमंत्री बनले. आता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
नगरसेवकपदापासून वाटचाल करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.
ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article