Ad imageAd image

हजारो हितचिंतकांनी दिल्या विश्वासराव नारायणराव धुराजी यांना शुभेच्छा : केला मानसन्मान : अमृतमहोत्सव थाटात

Ravindra Jadhav
हजारो हितचिंतकांनी दिल्या विश्वासराव नारायणराव धुराजी यांना शुभेच्छा : केला मानसन्मान : अमृतमहोत्सव थाटात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : पै पाहुणे, मित्रमंडळी आणि हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत चव्हाट गल्ली बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा मानसन्मान करण्यात आला.

त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजिण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्यावतीने विश्वासराव धुराजी यांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वासराव धुराजी यांच्या आजवरच्या आठवणींना उजाळा देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बेळगाव आणि परिसरातील अनेक सामाजिक, संघ संस्था, बँक, सार्वजनिक युवक मंडळे, महिला मंडळाच्या पदाधिकारी, नातेवाईक तसेच हितचिंतकांनी विश्वासराव धुराजी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. चव्हाट गल्ली जालगार मारुती मंदिर देवस्थान समिती, ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने देखील विश्वासराव धुराजी यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार व तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच प्रतापराव मोहिते उपस्थित होते.
प्रारंभी प्राध्यापिका विनोदिनी मुरकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विश्वासराव धुराजी यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध स्तरातील मान्यवर, हितचिंतक यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत कमिटी सदस्य प्रवीण जाधव, उत्तम नाकाडी, चंद्रकांत कणबरकर, किसनराव रेडेकर, सुनील मेलगे, उदय किल्लेकर, राजेश नाईक, शंकर किल्लेकर, विश्वजीत हसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article