कलह आणि मत्सर नसलेल्या घरातच सुख, समाधान आणि शांती असते : आचार्य 108 विशुद्धसागर महाराज

Ravindra Jadhav
कलह आणि मत्सर नसलेल्या घरातच सुख, समाधान आणि शांती असते : आचार्य 108 विशुद्धसागर महाराज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपाणी : कलह आणि मत्सर नसलेल्या घरातच सुख, समाधान आणि शांती असते. म्हणूनच प्रत्येकाने मत्सर टाळावा आणि प्रेमाने जीवन जगावे, असे अध्यात्मयोगी चर्याशिरोमणी आचार्य 108 विशुद्धसागर महाराज म्हणाले.

समाजातून माणुसकीची सेवा कमी झालेली आहे. प्राणी, पक्षावरील प्रेम कमी होत चालले आहे. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी एक दुसऱ्यावर प्रेम करतो आहे. आणि हेच आपल्या दुःखाचे कारण असून सुख किंवा दुःखासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. याचा सारासार विचार केला पाहिजे असे सांगताना पाप न करता जगा, हिंसा करणे, खोटे बोलणे, चोरी करणे हा अधर्म असल्याने ते टाळा असा सल्ला अध्यात्मयोगी चर्याशिरोमणी आचार्य 108 विशुद्धसागर महाराज यांनी दिला.

धर्मनगरी बोरगाव येथे आचार्य 108 विशुद्धसागर महाराज यांच्यासोबत 26 मुनीमहाराजांचे आगमन झाले. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते पाद पूजन झाल्यावर लहान बस्तीत आयोजित प्रवचनात विशुद्धसागर महाराज बोलत होते.

आपण दु:खी झालो तरच देवाची आठवण करतो. हे चुकीचे आहे. मंदिरात भगवंताची प्रतिमा असून त्याची आराधना करा असे सांगत वर्तमानाबरोबरच भविष्याचा विचार करा असा सल्ला वजा संदेश महाराजांनी यावेळी दिला.

यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, धर्मांनुरागी अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, मनोज पाटील, राजू मगदूम, सुजाता लगारे,अभयकुमार मगदूम, अभय करोले, अशोक पाटील, अशोक वठारे, विद्याधर अम्मन्नवर, भाऊसाहेब पाटील, बी. जे. पाटील, कुमार पाटील, अण्णासाहेब थोराप, बी. टी. वठारे, रावसाहेब तेरदाळे, राजगौडा पाटील, यांच्यासह अब्दुल लाट, बेडकीहाळ, इचलकरंजी, हेर्ले,बोरगाव परिसरातील श्रावक- श्राविका उपस्थित होत्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article