Ad imageAd image

‘ त्या ‘ युवकाचा केला गेला सन्मान

Ravindra Jadhav
‘ त्या ‘ युवकाचा केला गेला सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सायकलवरून चार धाम यात्रा करणाऱ्या येळ्ळूरचा जिगरबाज युवक अनंत धामणेकर याचा बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौक आणि येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवी मंदिर येथे सत्कार करण्यात आला.

अनंत धामणेकर याने युवा जागृतीसाठी सायकलवरून 4000 कि. मी. अंतराचा प्रवास अवघ्या 40 दिवसात करत देशातील चार धाम यात्रा पूर्ण केली. त्याच्या या युवा जागृती उपक्रमाबद्दल
बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर व आर. एम. चौगुले यांनी पुष्पहार घालून घालून तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे येळ्ळूर
गावातील श्री चांगळेश्वरी मंदिर येथे जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी शाल, श्रीफळ देऊन अनंत धामणेकर याचा सत्कार केला. याप्रसंगी हितचिंतक आणि बरेच गावकरी उपस्थित होते.

यावेळी आपल्या उपक्रमाबद्दल माहिती देताना अनंत धामणकर याने, सदर यात्रेचा बेळगावपर्यंतचा 4000 कि.मी. अंतराचा प्रवास आपण 40 दिवसात पूर्ण केला. आपण यावेळी दररोज 130 ते 150 किलोमीटर चे अंतर सायकलवरून कापत होतो. प्रवासादरम्यान प्रत्येक राज्यात आपले उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, असे सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article