बेळगाव : कर्नाटकी पोलीस प्रशासनाची दडपशाहीला न जुमानता आजच्या काळा दिनाच्या सायकल फेरीत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला सुरुवात झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, अशी घोषणाबाजी करीत तरुणाईने मूक सायकल फेरीत वाचा फोडत झालेल्या अन्यायाबद्दल निषेध व्यक्त केला.
पोलीस प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत सीमावासीयांच्या काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी देणार नाही, असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायकल फेरी होणारच या निर्धाराने सीमावासीयांनी
कर्नाटक पोलिसांची दडपशाही झुगारून काळा दिनाच्या फेरीत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तरुणाईसह महिला व बालचमूं आणि वयोवृद्धदेखील उत्साहाने सायकल फेरीत सहभागी झाले आहेत.