Ad imageAd image

उद्यापासून न्यायालयाच्या नियमित कामकाजाला होणार सुरुवात

Ravindra Jadhav
उद्यापासून न्यायालयाच्या नियमित कामकाजाला होणार सुरुवात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : उन्हाळी सुट्टी निमित्त थंडावलेला न्यायालयाचा आवार आता उद्या सोमवारपासून पुन्हा गजबजणार आहे.
न्यायालयाना यावर्षी एप्रिल अखेर पासून एक महिना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यामुळे न्यायालयीन आवारात महिनाभर शुकशुकाट पसरला होता. आता सोमवार दिनांक 27 मे पासून न्यायालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार असल्याने पुन्हा एकदा न्यायालयीन आवार पक्षकारांनी गजबजणार आहे.
उन्हाळी सुट्टी निमित्त दिवाणी व जिल्हा सत्र न्यायालयांचे कामकाज बंद होते. सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार असल्याने पक्षकारांच्या अडलेल्या कामकाजांना आता मार्ग मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article