मराठा बँकेवर सत्ताधाऱ्यांची सत्ता कायम : विश्वासार्हता आली कामी : निकालानंतर समर्थकांकडून एकच जल्लोष

Ravindra Jadhav
मराठा बँकेवर सत्ताधाऱ्यांची सत्ता कायम : विश्वासार्हता आली कामी : निकालानंतर समर्थकांकडून एकच जल्लोष
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव: मराठा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने आपली सत्ता कायम राखली. या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी केवळ सामान्य गटातील एक जागा वगळता सर्व जागांवर विजय मिळवला. प्रशांत चिगरे हे ओबीसी अ गटातून आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
आता पुन्हा विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार यांच्या नेतृत्वाच्या गटाला मतदारांचा कौल मिळाला असून आता याच गटाची सत्ता पुन्हा बँकेवर असणार आहे.

रविवारी चुरशीने मतदान झाले. अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांनी विजय मिळविला. त्यांना 841 इतकी मते मिळाली. तर त्यानंतर राखीव महिला गटातून रेणू किल्लेकर आणि दिपाली दळवी यांनी विजय मिळविला. रेणू किल्लेकर यांना 1063 वतर दिपाली दळवी यांना 868 इतकी मते मिळाली. त्यानंतर इतर मागास ब गटातून विश्वजीत हसबे यांनी विजय मिळविला. त्यांना 791 इतकी मते मिळाली. अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी विजय मिळवला. त्यांना 921 इतकी मते मिळाली.
विद्यमान संचालक लक्ष्मण होनगेकर यांनी कदम पाटील यांना पराभूत केले. विनायक होनगेकर हे नवव्या जागेसाठी निवडून आले.

सामान्य 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार दिगंबर पवार यांना 921 मते , बाळाराम पाटील यांना 883 मते , बाळासाहेब काकतकर यांना 868 , विनोद हंगिरकर यांना 863 , मोहन चौगुले यांना 783, विश्वनाथ हंडे यांना 771 , मोहन बेळगुंदकर यांना 733 , लक्ष्मण होनगेकर यांना 655 , विनायक होनगेकर यांना 648 मते मिळाली.

निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर गर्दी केली होती. निकाल घोषित करण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करून तसेच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article