दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक 15 डिसेंबरला : सामान्य गटात सात जागांसाठी नऊ उमेदवार आणि महिला गटात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात

Ravindra Jadhav
दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक 15 डिसेंबरला : सामान्य गटात सात जागांसाठी नऊ उमेदवार आणि महिला गटात दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी होणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत बी के मॉडेल हायस्कूल, कॅम्प बेळगाव येथे मतदान होणार आहे.

 

या निवडणुकीत एकंदर 988 पात्र सभासद मतदान करणार असून 13 जागा पैकी चार राखीव गटातून बिनविरोध उमेदवार निवडून आले असून आता केवळ सामान्य आणि महिला अशा दोन गटात ही निवडणूक होणार आहे.

येत्या 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधून विद्यमान संचालक असलेले सर्वश्री रणजीत चव्हाण पाटील, अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर व सुहास तराळ हे निवडणूक लढवीत आहेत.

सामान्य गटातून प्रवीण अष्टेकर, चांगदेव लाड, निहाल शहापूरकर ,मंजुनाथ पाटील, विकास मेणसे, विशाल राऊत, सदानंद सामंत, संदीप लामजी व ज्ञानेश्वर सायनेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर महिला गटातून स्नेहल राऊत, परिशिष्ट जाती गटातून चेतक कांबळे, विजय मोरे ,विद्याधर कुरणे यांनी अर्ज मागे घेतले आणि परिशिष्ट जमाती गटातून परशुराम शिगीहल्ली आदींनी आपले अर्ज मागे घेतले.
गेल्या पाच वर्षात विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बँकेची उल्लेखनीय प्रगती केली असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत असे उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर अनेकांनी म्हटले आहे.

निवडणूक रिंगणात सामान्य गटात सात जागांसाठी नऊ उमेदवार आणि महिला गटात दोन जागांसाठी चार उमेदवार असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article