कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेला मिळतोय नाट्यसंघांचा उत्तम प्रतिसाद : छानणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Ravindra Jadhav
कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेला मिळतोय नाट्यसंघांचा उत्तम प्रतिसाद : छानणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगांवकर नाट्यरसिक ज्या स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेस स्पर्धक संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . सातत्याने गेली 12 वर्षे भव्य एकांकिका स्पर्धेप्रमाणेच यंदाच्या स्पर्धामध्ये देखील कर्नाटक, महाराष्ट्र, व गोवा येथील संघ आपल्या कलेचा आविष्कार बेळगांव नगरीत सादर करणार आहेत .

नवनवीन कलाकार लेखक दिग्दर्शक निर्माण व्हावेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात असलेल्या नाटय संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी व आपल्या परिसरातील नाट्य परंपरा जोपासता यावी हा यामागचा संस्थेचा मूळ उद्देश साध्य होताना दिसत आहे. स्पर्धक संघाकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे सदर स्पर्धा 2 दिवस भरविण्यात येणार आहे.
एकंदरीत पाहता यंदाची स्पर्धा अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली असून छानणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. .शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगांव येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले.आहे.

दि. 4 व 5 जानेवारी 2025 दरम्यान सकाळी 10 पासून रात्री 9 या कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित रोज साधारण 10 एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.स्पर्धेचे काम युध्य पातळीवर सुरू असून या स्पर्धेतून नाट्यरसिकांना दर्जेदाऱ एकांकिकेच्या मालिकेची पर्वणी तर नवोदित कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध होणार आहे . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्गज परीक्षकांना विविध शहरातून आमंत्रित करण्यात आले आहे.स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दि.05 जानेवारी 2025 रोजी मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे.
बेळगांवकरांनी स्पर्धेला प्रतिसाद द्यावा,असे आवाहन कॅपिटल वनचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी केले आहे.

प्रवेश विनामूल्य
ही स्पर्धा नाट्यरसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य असून सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत होणार असल्याने ,ज्या नाटय रसिकांना एवढा वेळ बसने शक्य नाही अशा रसिकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास यावे.पण प्रयोग सुरू असताना ये जा करु नये व आपला मोबाईल सायलेंट मोड                (silent mode ) वर ठेवावा स्पर्धेत अडथळा आणू नये व संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article