युवकांचे प्रसंगावधान : वाचविला वृद्धाचा जीव

Ravindra Jadhav
युवकांचे प्रसंगावधान : वाचविला वृद्धाचा जीव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 19 ( प्रतिनिधी) : आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उचगाव जवळील मार्कंडेय नदी पात्रात उडी घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जीव उचगावचा विशाल हंडे आणि अतवाडचा यतेश हेब्बाळ या दोन युवकांनी वाचविला. अन्यथा अनर्थ घडला असता.

गांधीनगर – बेळगाव येथे राहणारी तुकाराम नामक व्यक्ती आज सोमवारी सकाळी उचगाव नजीकच्या मार्कंडेय नदी पुलावरुन नदीत उडी घेण्याच्या प्रयत्नात होती. याचवेळी त्या मार्गावरून चाललेल्या विशाल हंडे व यतेश हेब्बाळ यांनी वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी चालविलेली धडपड पहिली आणि धावत जाऊन नदीत उडी घेण्यासाठी पुलावरील रेलिंगवर चढलेल्या त्या वृद्धाला खाली खेचून आणले.

यावेळी त्या युवकांनी वृद्धाची विचारपूस केली असता आपण जीवनाला कंटाळून नदीत उडी टाकून आत्महत्या करणार होतो, असे सांगितले. विशाल व यतेश यांनी त्या वृद्धाच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्या वृद्धाला घरच्या लोकांकडे पोहोचविल्याचे समजते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article